मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालली आहे. ही आवड पुन्हा निर्माण करण्यासाठी कन्नड येथे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘पुस्तक पेटी’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार
या उपक्रमातून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे. पुस्तकांशी मैत्री वाढावी आणि विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जाऊ नयेत, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी पुस्तकांकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply