मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरला ‘बदकांचा राजपुत्र’ टफ्टेड डक

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सायबेरिया आणि आइसलँडमधून आलेला टफ्टेड डक दाखल झाला आहे. काळ्या पंखांवर सोनेरी डोळे आणि डोक्यावरील मोहक तुरा या पक्ष्याला ‘बदकांचा राजपुत्र’ ठरवतो.

नांदूरमध्यमेश्वरला ‘बदकांचा राजपुत्र’ टफ्टेड डक

सध्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाने गजबजले आहे. हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरणाऱ्या या ठिकाणी जैवविविधतेचे जतन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येथे रोजच नवनवीन पक्षी येत असून, पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमी शेकडोंच्या संख्येने येथे येत आहेत. सध्या येथे ‘टफ्टेड डक’ म्हणजेच विलोभनीय बदकांचा राजपुत्र म्हणवला जाणारा पक्षी आला असून, आता काही महिने तो येथे मुक्कामी राहणार आहे.

सायबेरियातून हजारो मैलांचा प्रवास

दूर युरोपातील सायबेरिया आणि आइसलँडच्या गोठलेल्या प्रदेशातून हजारो मैलांचा खडतर प्रवास करत हा बदक नांदूरमध्यमेश्वरच्या पाणथळ क्षेत्रावर दर वर्षी हजेरी लावतो. हा टफ्टेड डक काळ्या रंगाचा असतो. चकाकणाऱ्या गडद काळ्या पंखांची शान, त्यावर लख्ख सोनेरी डोळ्यांची ठेवण आणि डोक्यावर हवेत मुकुटासारखा डोलणारा मोहक तुरा या पक्ष्याचे सौंदर्य अधिकच वाढवतो. इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो. अंधूक प्रकाशातही लख्ख चमकणारे त्याचे सोनेरी-पिवळे डोळे आणि धोका जाणवताच पाण्याखाली अचानक अदृश्य होऊन दूर मान वर करण्याचा त्याचा खेळ थक्क करणारा आहे. याला प्रत्यक्ष बघितल्यावर निसर्गाचा हा जादूगार मनाला भुरळ घालतो.

पक्षीप्रेमींना भेटीचे आवाहन

टफ्टेड डक म्हणजेच एक विलोभनीय बदकांचा राजपुत्रच असल्याचे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी सांगितले. इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो आणि नांदूरमध्यमेश्वर पाणथळावर असे अनेक पक्षी आले आहेत, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी, शिक्षक, पक्षी अभ्यासक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी नांदूरमध्यमेश्वरला भेट द्यावी आणि सहभागी व्हावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance