केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी शहरात जोरात सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शहरभर मोठमोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरमुळे संपूर्ण शहरात शिंदेसेनेची चर्चा रंगली आहे.
विमानतळापासून हॉटेलपर्यंत बॅनरांची रांग
पुणे विमानतळापासून जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलपर्यंतच्या मार्गावर हे बॅनर लावण्यात आले आहेत. शहा ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या संपूर्ण मार्गिकेवर बॅनर दिसत आहेत. बॅनरवर प्रमुख नेत्यांचे फोटो लावण्यात आले असून ते येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
भाजपच्या बॅनरपेक्षा अधिक चर्चा
या दौऱ्यानिमित्त भाजपनेही शहरात बॅनर लावले आहेत. मात्र शिंदेसेनेच्या बॅनरची चर्चा त्यापेक्षा अधिक होत असल्याचे दिसत आहे. बॅनरबाजीच्या या स्पर्धेत शिंदेसेनेने भाजपलाही मागे टाकल्याचे बोलले जात आहे. शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण तापले असून बॅनरबाजी हा चर्चेचा विषय बनला आहे.
Leave a Reply