पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरात पुढील दोन दिवस वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल राहणार असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव विविध मार्गांवर नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. अवजड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या भागांत कार्यक्रम?
अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी, जिल्हा परिषद, नेहरू मेमोरियल हॉल, जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आजपासून पुढचे दोन दिवस पुण्यातील काही रस्ते नो पार्किंग झोन म्हणून राहणार आहेत.
पर्यायी मार्गांचा वापर करा
पुणेकरांनी पुढील दोन दिवस प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून बाहेर पडावे. अवजड वाहनांवरील बंदीमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
Leave a Reply