राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट
सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का गेल्या आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भेटीमागे नेमके काय कारण आहे, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेट
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अशा वेळी सुनेत्रा पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने नेमके काय सुरू आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. या भेटीमुळे आगामी राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply