मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. ही भेट पावणे दोन तास चालली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऊर्जा विभाग आणि महाजेनकोवर चर्चा
बैठकीदरम्यान महाजेनकोशी संबंधित ऊर्जा विभागाच्या विषयावर सविस्तर बोलणी झाली. ऊर्जा क्षेत्रातील सध्याच्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावरही बोलणी
ऊर्जा विभागाबरोबरच राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अजित पवार गटातील काही आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्याच्या वृत्तावरून महायुतीमध्ये निर्माण झालेल्या चिंतेबाबतही बोलणे झाल्याची माहिती आहे.
या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पुढील काळात या विषयावर काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply