अभिनेत्री अर्चना पूराण सिंह आणि परमीत सेठी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडीने १२ डिसेंबरला पुन्हा लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. ही बातमी त्यांनी स्वतः शेअर केली आहे. ‘पती, पत्नी आणि पंगा’ या कार्यक्रमाच्या सेटवर पत्रकारांशी बोलताना अर्चना पूराण सिंह म्हणाल्या की, आम्हाला दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी पार्टी द्या.
पहिलं लग्न चोरून झालं होतं
अर्चना यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लग्न केले होते, तेव्हा ते चोरून, लपून-छपून आणि कमी लोकांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर परमीत म्हणतात की, चूक झाली. त्यावर अर्चना म्हणाल्या की, आम्ही ही चूक पुन्हा करणार आहोत, पण यावेळी खूप लोकांसमोर. त्यामुळे या जोडीच्या पुन्हा होणाऱ्या लग्नाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
लग्नाचे सर्व कार्यक्रम धूमधडाक्यात होणार
अर्चना आणि परमीत यांनी सांगितले की, यावेळी लग्नाचे सर्व कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांत पाहुण्यांना मजा येणार आहे. ‘पती, पत्नी आणि पंगा’ या शोचा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोड्या हजेरी लावताना दिसत आहेत. प्रेक्षकांना त्यांची हजेरी प्रचंड आवडत आहे. शोचा टीआरपी टिकवून ठेवण्यासाठी निर्माते दररोज काहीतरी नवीन करत असतात. आता त्यांनी अर्चना पूराण सिंह आणि परमीत सेठी यांचे पुन्हा लग्न लावण्याची योजना आखली आहे. या जोडीच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. याआधी निर्मात्यांनी ‘पती, पत्नी आणि पंगा’ सीझन १ मध्ये अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांचे लग्न लावले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply