बल्गारियामध्ये मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. पूर्व बल्गारियातील महामार्गावर दाट धुक्यामुळे सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.
सोफिया ते बर्गास महामार्गावर दुर्घटना
हा अपघात राजधानी सोफिया ते बर्गास शहराला जोडणाऱ्या ए-१ महामार्गावर घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघात इतका भीषण होता की महामार्गावरील सहाही मार्गांवर कार आणि ट्रकचा खच पडला होता. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर काही वाहने उलटली होती.
जखमींवर उपचार सुरू
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply