गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोनिया गांधींच्या पुस्तकातील खुलासे; परदेशी मुद्द्याने दु:ख

सोनिया गांधी यांचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव' हे पुस्तक प्रकाशित झाले. परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने दु:ख झाले होते, अशी कबुली त्यांनी पुस्तकात दिली आहे.

सोनिया गांधींच्या पुस्तकातील खुलासे; परदेशी मुद्द्याने दु:ख

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ हे पुस्तक मंगळवारी प्रकाशित झाले आहे. एकूण सात भाग असलेल्या या पुस्तकात सोनिया गांधी यांनी अनेक राजकीय प्रकरणांवर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. या पुस्तकात त्यांच्या जीवनातील खाजगी आणि वेदनादायक काळाचाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांनी मे १९९१ मध्ये त्यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या दिवसांचाही उल्लेख केला आहे.

या पुस्तकात सोनिया गांधी यांनी आपल्या परदेशी असल्याचा मुद्दा आणि पंतप्रधानपद नाकारल्याच्या मुद्याचाही ऊहापोह केला आहे. केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने आपल्याला दु:ख झाले होते, असे त्यांनी म्हटले आहे. पवार यांच्या वक्तव्यानंतर आपण थेट बैठकीतून बाहेर पडलो, असेही त्यांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरनंतरचे जीवन

साल २०१० मध्ये जेव्हा डॉक्टरांनी ब्रेस्ट कॅन्सरची शंका असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, तेव्हा आपण आतून हादरून गेलो होतो, असे सोनिया गांधी यांनी लिहिले आहे. मनात वाईट विचार आणि संभाव्य भयानक परिणामाची भीती येऊ लागली होती. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण भारतात राहिल्यास प्रसारमाध्यमांत आजारपणाची प्रचंड चर्चा झाली असती. त्यामुळे इटलीच्या मिलान येथील युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे.

राजीव गांधी यांचे पंतप्रधानपद

३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर जेव्हा राजीव गांधी यांनी सांगितले की पक्षाच्या इच्छेमुळे मी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, त्यावेळी आपण प्रचंड चिडलो आणि हादरून गेलो, असे सोनिया गांधी यांनी लिहिले आहे. त्याक्षणी त्यांना असे वाटले की कुणीतरी सुरा घेऊन त्यांच्या छातीत खुपसला आहे आणि हृदयावर खोल जखम झाली आहे. त्यांनी राजीव यांच्यासमोर हात जोडून आणि रडून विनंती केली की हे पद स्वीकारू नका, कृपा करा आणि मुलांचा विचार करा. त्यांना भीती वाटत होती की ते तुम्हालाही मारून टाकतील. त्यावर राजीव यांनी शांतपणे उत्तर दिले की होय, मलाही कदाचित असेच मारतील.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance