मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती, रोहित पवारांचा आरोप

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांना त्यांची जागा घ्यायची होती, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. विलीनीकरणावर तटकरेंची भूमिका बदलल्याचे ते म्हणाले.

तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती, रोहित पवारांचा आरोप

खासदार सुनील तटकरे यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची जागा घ्यायची होती आणि पक्षाचा ताबा स्वतःकडे ठेवायचा होता, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर सहकुटुंब येऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला. तटकरेंच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वक्तव्यामध्ये तफावत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

विलीनीकरणावरून भूमिका बदलल्याचा आरोप

विलीनीकरणाच्या चर्चेवरून सुनील तटकरे यांच्या भूमिकेमध्ये विरोधाभास होत असल्याच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता, आमदार रोहित पवार म्हणाले की, काही व्यक्तींना अजित पवार गेल्यानंतर त्यांची जागा घ्यायची होती आणि पक्षाचे नियंत्रण स्वतःकडे ठेवायचे होते. या पार्श्वभूमीवर दुनियेला दाखवण्यासाठी अजित पवारांनी विलीनीकरणाची कोणतीच चर्चा आपल्याबरोबर केली नव्हती, असे तटकरे यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र, आमदार आपल्या सोबत येणार नसल्याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांची चलबिचल झाली असावी, आणि नऊ महिन्यानंतर त्यांनी अजित पवार असते, तर विलीनीकरण झाले असते, असे वक्तव्य केले, असे रोहित पवार म्हणाले. बऱ्याच वेळा काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, त्यावेळी मनाचा समतोल सुटतो आणि वेगळे बोलले जाते, तीच अवस्था सुनील तटकरेंची झाली असावी, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

भाजपसोबत कधीही जाणार नाही – रोहित पवार

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी भाजप हा भांडवलदारांचा पक्ष असून, जाती-धर्मात भांडणे लावणारा व कुटुंब फोडणारा पक्ष आहे, असे सांगितले. त्यामुळे अशा पक्षाबरोबर आम्ही कधीही जाणार नाही, असे स्पष्ट करत ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance