अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांनी आपली तिसरी पत्नी ॲना लेझनेव्हा हिच्यापासून वेगळे होत असल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच त्यांची माजी पत्नी आणि अभिनेत्री रेणू देसाई हिने समाजमाध्यमांवर एक सूचक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने सहानुभूती बाळगण्याबद्दल आणि लोकांशी आदराने वागण्याबद्दल भाष्य केले आहे. रेणूने या पोस्टमध्ये पवनचा उल्लेख केला नसला तरी तिच्या या पोस्टने लक्ष वेधले आहे.
रेणू देसाईने पोस्टमध्ये काय म्हटले?
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रेणूने लिहिले की, एखादी व्यक्ती आधीच कठीण काळातून जात असताना तिच्यावर टीका करणे योग्य नाही. आधीच संकटात असलेल्या व्यक्तीला अधिक त्रास देणे हे अमानवीय आहे. त्यांची सामाजिक स्थिती काहीही असो, हे विसरू नका की ती व्यक्तीही शेवटी माणूसच आहे, कोणाचे तरी अपत्य, कोणाचे तरी पालक किंवा कोणाची तरी भावंड आहे.
इतरांच्या घरावर दगडफेक करू नका, असे आवाहन करत रेणूने म्हटले की, आपण सर्व माणसे आहोत आणि माणूस म्हणून जगण्यासाठी सहानुभूती आणि दयाळूपणा हे सर्वात मूलभूत गुण आहेत. तिने हे शब्द लिहिले आहेत म्हणून उगाच मूर्खपणाचे तर्क लावू नका, असेही तिने स्पष्ट केले. तिच्या मते, समाज म्हणून आपण अधिक चांगल्या प्रकारे वागू शकतो. दयाळू किंवा समजूतदार असण्यासाठी तिला कोणीही पैसे दिलेले नाहीत, तर तिच्या विचारक्षमतेचा वापर करून ती जगाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहते, त्याचेच हे प्रतिबिंब आहे, असे तिने म्हटले आहे.
तसेच रेणूने आणखी एक पोस्ट करत दुसऱ्यांच्या दुःखावर मजकूर तयार करणाऱ्यांना कर्माचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. अभिनेत्रीची ही पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे.
रेणू आणि पवन यांचा प्रवास
रेणू देसाई या पवन कल्याण यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांची पहिली भेट २००० मधील ‘बद्री’ या तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटातून रेणू यांनी पवन कल्याण यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले आणि जानेवारी २००९ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना अकिरा नंदन (मुलगा) आणि आद्या (मुलगी) ही दोन मुले आहेत. मात्र, २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply