ऐन दिवाळीत देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. आज देशातील नऊ राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही राज्यांमध्ये तापमानात चढ-उतार सुरू असून, काही ठिकाणी थंडी पडली आहे तर काही ठिकाणी उन्हाचा तडाका कायम आहे.
ईशान्येकडील राज्यांत पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या सात ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडेल. त्यासोबतच हिमाचल प्रदेशातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात थंडीची चाहूल
महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने हवामानात बदल जाणवू लागला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply