करवा चौथच्या दिवशी पत्नीने पतीच्या मानेभोवती पाय ठेवून अनोख्या पद्धतीने उपवास सोडल्याचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पती-पत्नीचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चांगलाच आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
करवा चौथ हा सण २९ ऑक्टोबरला देशभरात प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांत साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हा उपवास धरतात. उपवासादरम्यान त्या पाणीही पित नाहीत. या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत करवा चौथची प्रथा एका वेगळ्याच अंदाजात पार पडताना दिसते.
व्हिडिओत नेमके काय दिसते
व्हायरल व्हिडिओत एक जोडपे करवा चौथ करताना दिसते. उपवास सोडताना पत्नीने असा काही स्टंट केला की, ते पाहून अनेक जण थक्क झाले. व्हिडिओत महिला चाळणीत दिवा घेऊन पतीच्या एका पायावर उभी आहे. या काळात ती आपला एक पाय पतीच्या माने भोवती आणि दुसरा पाय पतीच्या मांडीवर ठेवत बॅलन्स करते. हे सर्व करताना ती जराही डगमगत नाही.
व्हिडिओत महिला हा स्टंट करताना अगोदर चंद्राचे दर्शन घेते, मग आपल्या पतीचे दर्शन घेते. तिचा उपवास सोडण्याचा हा अंदाज खरंच कौतुकास्पद असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ही संकल्पना पतीची की पत्नीची, याचा अंदाज बांधता येत नाही. मात्र, अशा प्रकारचा व्हिडिओ साकारताना पतीने आपल्या पत्नीला ज्या प्रकारे साथ दिली, ते वाखाणण्याजोगे आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, स्त्री आहे, ती काहीही करू शकते. तर दुसऱ्याने म्हटले की, पतीचा अखेरचा करवा चौथ. आणखी एकाने लिहिले की, हे पाहून चंद्रही आकाशात लपून बसला. काहीही असो, अनेक जण हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत. हा व्हिडिओ तेवढा मजेशीर आहे, तेवढाच पती-पत्नीमधील संतुलनाचे जिवंत उदाहरणही ठरत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply