भारतीय पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ हा २०२६ मधील बहुचर्चित चित्रपट आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. दोन भागांमध्ये सादर करण्यात येणाऱ्या रामायण मालिकेतील हा पहिला भाग आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाची भव्य आणि आधुनिक सिनेमॅटिक मांडणी चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसांतच चित्रपटाने तिकीट खिडकीवर बक्कळ कमाई केली आहे.
चार दिवसांचे कलेक्शन
अवघ्या चार दिवसांत ‘रामायण’चे जागतिक स्तरावरील एकूण उत्पन्न ५०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. सध्या या चित्रपटाचे जागतिक स्तरावरील एकूण उत्पन्न ४९९.२० कोटी रुपये इतके झाले आहे. हा पौराणिक महाकाव्यपट भारतात २०० कोटी रुपयांच्या नेट कमाईचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे.
वीकेंडला रविवारी चित्रपटाने ५६.१५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारच्या कमाईमुळे पहिल्या वीकेंडचे एकूण उत्पन्न १७४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन २८५.२० कोटी रुपयांवर पोहोचले असून सध्या भारतातील एकूण नेट कमाई २३८.८५ कोटी रुपये इतकी झाली आहे. परदेशातील बाजारपेठांतून २१४ कोटी रुपयांची भर पडली आहे.
रविवारच्या कमाईमध्ये हिंदी आवृत्ती आघाडीवर होती. हिंदी आवृत्तीने १७,७१४ शोजमधून ३६.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर कन्नड आवृत्तीने ७.२५ कोटी रुपये, तेलुगू आवृत्तीने ६.२५ कोटी रुपये, तमिळ आवृत्तीने ३.१५ कोटी रुपये आणि मल्याळम आवृत्तीने २.७५ कोटी रुपयांची कमाई केली.
कलाकार आणि संगीत
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकले आहेत. साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
या चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांनी एकत्र काम केले आहे. ‘रामायण’ ४००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply