राज्यात आगामी काळात मोठा राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान आता दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवरही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानामुळे नवे वळण मिळाले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत अतिशय सूचक आणि मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रघुवंशी नेमके काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जर पुन्हा एकत्र आले, तर तीच खऱ्या अर्थाने खरी दिवाळी असेल, असे रघुवंशी यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाकडे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
चर्चेला उधाण
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा समोर आल्याने राज्याच्या राजकारणात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी दिवसांत या चर्चेला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply