दिवाळी हा दिव्यांचा सण असला, तरी या काळातील सर्वांत महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, अशी प्रार्थना केली जाते. देवी धनाची देवता मानली जात असल्याने धनाचीही पूजा केली जाते. पूजेनंतर आरती होऊन प्रसाद वाटला जातो. या दिवशी झाडूची पूजा करण्याचीही पद्धत आहे.
शुभ मुहूर्ताची वेळ
लक्ष्मीपूजन संध्याकाळी केले जाते, कारण देवी तिन्ही सांजेला घरात येते, अशी मान्यता आहे. पंचांगानुसार यंदाचा मुख्य शुभ मुहूर्त (वृषभ लग्न / स्थिर लग्न) संध्याकाळी ५:५४ ते रात्री ७:५० असा आहे. हा कालावधी १ तास ५६ मिनिटांचा आहे. या सुमारे दोन तासांच्या मुहूर्तात देवीची शास्त्रोक्त पूजा करता येईल.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील वेळा
मुंबईत पूजेचा मुहूर्त संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७ असा आहे. पुण्यात संध्याकाळी ६:२४ ते रात्री ८:२४, नागपुरात संध्याकाळी ५:५९ ते रात्री ७:५८, नाशिकमध्ये संध्याकाळी ६:२२ ते रात्री ८:२२, छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी ६:१६ ते रात्री ८:१६ आणि कोल्हापुरात संध्याकाळी ६:२५ ते रात्री ८:२६ अशी वेळ आहे. देवीची पूजा व्यवस्थित पार पडल्यास ती कृपा करते, अशी मान्यता असल्याने अनेकजण पूजेची वेळ आधीच निश्चित करून ठेवतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply