सारा तेंडुलकरने तिच्या ऑफिसमधील दिवाळी पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे वडील सचिन तेंडुलकर हे पिवळा कुर्ता घालून खाली बसून रांगोळी काढताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सचिन यांच्या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साराने ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये सर्वांसाठी ही पार्टी आयोजित केली होती. तिचे संपूर्ण कुटुंब या पार्टीला उपस्थित होते. फोटोंमध्ये कुटुंब एका टेबलावर बसून जेवताना दिसत आहे. सचिन यांनी लाल रंगाची फुलांची रांगोळी काढली आहे.
खाली बसून रांगोळी काढल्याचे कौतुक
सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव असूनही त्यांनी खाली बसून स्वतः रांगोळी काढली. यामुळे त्यांचे खूप कौतुक होत आहे. लोकांनी कमेंट करत सचिन यांचे भरभरून कौतुक केले आहे. सचिन हे किती साधे आणि सरळ आहेत, हे त्यांच्या कृतीतून नेहमीच दिसून येते, असे या फोटोंवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
साराने तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये ती तिचे वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली तेंडुलकर यांच्यासोबत दिसत आहे. तिची वहिनी सानियादेखील तिच्या मागे उभी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply