दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका कपड्याच्या दुकानात अवघ्या एका रुपयात टी-शर्ट देण्याची ऑफर ठेवण्यात आली होती. एरव्ही कोणतीही ऑफर म्हटले की महिलांची गर्दी होत असते. परंतु आता एक रुपयात टी-शर्ट मिळणार या ऑफरमुळे तरुणांची संभाजीनगरात इतकी गर्दी उसळली की गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.
पहिल्या ५०० ग्राहकांना एक रुपयात टी-शर्ट
छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील ब्रँड ट्वेंटी या दुकानात पहिल्या येणाऱ्या ५०० ग्राहकांना अवघ्या १ रुपयात टी-शर्ट देण्यात येणार होता. या ऑफरला भुलून शेकडो तरुणांनी या आऊटलेटमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जसजसा सूर्य वर येऊ लागला तसे या दुकानातील गर्दीचा भर वाढतच गेला.
या ऑफरची माहिती मिळताच हजारो ग्राहकांनी दुकानाबाहेर गर्दी केली. गर्दी इतकी वाढली की दुकानदाराला या गर्दीला आवरणे कठीण झाले.
बाऊन्सर, मग पोलिसांची कुमक
या गर्दीला आवरण्यासाठी आधी बाऊन्सर बोलावण्यात आले, मात्र गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ही गर्दी पांगवली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply