इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या पुढाकारातून आणि संपूर्णम नाशिक यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘दिव्य कलेक्शन’ हा विशेष पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवतांच्या जुन्या व भग्न झालेल्या मूर्ती, मूर्तीसाठी वापरलेले जुने वस्त्र, धार्मिक पुस्तके, छायाचित्रे तसेच फोटोफ्रेम अशा सुमारे १५० किलो विविध वस्तू पुनर्चक्रणासाठी जमा करण्यात आल्या. हे साहित्य नाशिक येथे पाठविण्यात आले.
सिंधी कॉलनीत कलेक्शन सेंटर
या संकलनासाठी सिंधी कॉलनी सोसायटीच्या ग्राउंडवर कलेक्शन सेंटर उभारण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सहभाग नोंदवत जवळपास १५० किलो साहित्य पुनर्चक्रणासाठी जमा केले. हे सर्व साहित्य पुढील प्रक्रियेसाठी संपूर्णम, नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आले.
श्रद्धेचा आदर आणि पर्यावरण रक्षण
धार्मिक श्रद्धेचा आदर राखत जुन्या व वापरात नसलेल्या धार्मिक वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या प्रेसिडेंट मोनाली लकडे, रश्मी चिचाणी, स्वाती मोरे, वैशाली सदगुले, नाशिकच्या संगीता गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply