चीन जमिनीवर असो वा समुद्रात, प्रत्येक ठिकाणी आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. या दादागिरीला केवळ भारतच नाही, तर अनेक देश कंटाळले आहेत. आता हे देश चीनला सणसणीत उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे — चीनचा शत्रू मानला जाणारा देश आता भारताचा मित्र बनला आहे.
चीनच्या शत्रूशी भारताची मैत्री
चीन श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांना हाताशी धरून भारताविरोधात जे करतो, तेच आता भारताने केले आहे, असा या घडामोडीचा अर्थ लावला जात आहे. भारताने चीनच्या शत्रू देशाशी मैत्री वाढवली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा हनोई दौरा आणि दक्षिण चीन समुद्राबाबत चीनची चिंता या पार्श्वभूमीवर भारत-व्हिएतनाम संबंधांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दक्षिण चीन समुद्राभोवती वाढता तणाव
समुद्रातील वर्चस्वावरून चीनची अनेक देशांशी खटके उडत असतात. जमिनीवरही चीनची भूमिका अनेकदा आक्रमक राहिली आहे. त्यामुळे चीनला कंटाळलेले देश आता एकमेकांच्या जवळ येत आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील वाढती जवळीक ही त्याचाच एक भाग मानली जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply