किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची शासकीय खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शासनाने नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविली असून, जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.
खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये ज्वारी, मका व बाजरी या पिकांच्या नोंदणीसाठी यापूर्वी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अधिक कालावधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने आता ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना सातबारा उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. सातबारा उताऱ्यावर संबंधित पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.
जिल्ह्यातील नोंदणीसाठीची खरेदी केंद्रे
- येवला – तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, येवला – ९४२३१७६३४९
- मालेगाव – शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, मालेगाव – ८९९९४६९९९०
- देवळा – तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, देवळा – ९७६७५७९६१४
- विंचूर – कृषिसाधना म.फळे व भाजी सहकारी संस्था, विंचूर – ७०३८५०५३८६
- सिन्नर – तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, सिन्नर – ९७६७६०२८५२
- चांदवड – तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, चांदवड – ९०११२०४१३०
- सटाणा – विविध कार्यकारी सहकारी संस्था, सटाणा (भाग) – ९४२०३६७०७५
- नामपूर – विविध कार्यकारी सहकारी संस्था, नामपूर – ९४२१५०१८३६
- नांदगाव – ज्ञानेश्वर नांदगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, नांदगाव – ९४२०२३०७७७
- अंदरसूल – सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे विविध कार्यकारी सेवा संस्था, अंदरसूल – ९४२३२२०९३९
- लासलगाव – लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघ, लासलगाव – ९७६३४२१२५७
शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई यांच्या जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Leave a Reply