बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे वादळ भारताच्या दिशेने सरकत असून, ते उद्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना तातडीने अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे
भारतीय हवामान विभागाने या वादळादरम्यान ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. किनारी भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या मार्गावर आणि त्याच्या तीव्रतेवर प्रशासनाचे लक्ष आहे.
तामिळनाडूत मालगाडीचे डबे रुळावरून घसरले
दरम्यान, तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात एक वेगळी घटना समोर आली आहे. तेथे इंजिन नसलेल्या मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दोन्ही घटनांमुळे संबंधित भागात खळबळ उडाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply