जपानमध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी हा भूकंप झाला असून, त्याची तीव्रता ६.० इतकी नोंदवण्यात आली आहे.
भूकंपाचे केंद्र कुठे होते?
भूकंपाचे केंद्र जपानमधील शिमा शहराच्या दक्षिण-दक्षिण पूर्वेला ५८ किलोमीटर अंतरावर होते. धक्के जाणवताच अनेक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली.
नुकसानीची माहिती नाही
या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जपानमध्ये यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजीही भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी नोंदवण्यात आली होती.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply