सिनेमाच्या पडद्यावर खाकी वर्दी घालून गुंडांना सळो की पळो करून सोडणारे बॉलिवूड कलाकार आता खऱ्या कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘बोलो जुबां केसरी’ म्हणत पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
निर्बंध असतानाही जाहिराती सुरूच
राज्यात पानमसाला आणि विमलच्या जाहिरातींवर कडक कायदेशीर निर्बंध असतानाही कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती सुरू असल्याचा मुद्दा या कारवाईमागे आहे. त्यामुळे एफडीएने थेट संबंधित कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रकरण न्यायालयात
दरम्यान, या कारवाईनंतर संबंधित कलाकारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. त्यामुळे या वादावर न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply