युवांनी बदलत्या काळानुसार आपल्या आवडी, कौशल्ये आणि क्षमतांचा योग्य विचार करून करिअरची दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच आजच्या काळातील एआय तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि नव्या करिअर संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत भावना कॉलेज ऑफ इंटिरियर डिझाईनच्या प्राचार्या भावना मेळवणे यांनी व्यक्त केले.
‘झेप युवा करिअर महोत्सव २०२६’ मध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. शिक्षण क्षेत्रातील विविध संधी, योग्य करिअर निवडीचे महत्त्व आणि भविष्यातील बदलत्या कौशल्यांची गरज याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
एआय आणि कौशल्यांवर भर
ॲनिली ॲकॅडमी आणि स्वयंसिद्धा महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झाला. ‘युवांसाठी एआय, कौशल्य आणि भविष्याची ओळख’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि भविष्यातील बदलत्या कार्यक्षेत्रांची माहिती मिळाली.
तज्ज्ञांशी संवाद
महोत्सवामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्स यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ऋतू शिंदे आणि शगुन साळुंखे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारण्यात आला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply