पुण्यात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवी आणि धोकादायक युक्ती वापरल्याचे उघडकीस आले आहे. एका व्यावसायिकाला वरिष्ठांच्या नावाने मेसेज आला आणि त्याने परस्पर १६ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र नंतर तो मेसेज वरिष्ठांचा नसून सायबर चोरट्याचा असल्याचे त्याच्या लक्षात आले.
मोबाईल हॅक करून नाव बदलण्याची युक्ती
या फसवणुकीमागे अकाउंटंटचा मोबाईल हॅक करण्याची युक्ती वापरण्यात आली. मोबाईल हॅक केल्यानंतर संपर्क यादीतील नाव बदलण्यात आले, त्यामुळे आलेला मेसेज खरोखरच वरिष्ठांचा असल्याचा भास निर्माण झाला. या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून व्यावसायिकाने मोठी रक्कम पाठवली.
सायबर गुन्हेगारांच्या या नव्या प्रतापामुळे व्यावसायिक आणि नोकरदार वर्गात चिंता व्यक्त होत आहे. पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधून खात्री करणे, ही खबरदारी अशा फसवणुकीपासून वाचवू शकते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply