श्वासावाटे शरीरात प्रवेश करणारी दूषित हवा केवळ शारीरिक आजारांनाच कारणीभूत ठरत नाही, तर ती आता थेट मेंदूवरही आघात करत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. प्रदूषणाच्या अतिसूक्ष्म कणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने मेंदूचा आकार आकुंचन पावण्याचा धोका असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
विशेषतः सर्वाधिक प्रदूषण असलेल्या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये स्मृतीभ्रंश, म्हणजेच डिमेन्शियाचा धोका सुमारे १४ टक्क्यांनी वाढल्याचे या अभ्यासात निष्पन्न झाले आहे. राजधानी दिल्ली असो किंवा आर्थिक राजधानी मुंबई, दोन्ही महानगरांतील वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे.
मुंबईतील स्थिती चिंताजनक
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा समावेश होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. दूषित हवेचा दीर्घकालीन संपर्क आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
दीर्घकालीन परिणाम महत्त्वाचा मुद्दा
या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा दीर्घकालीन परिणाम हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. प्रदूषणाच्या अतिसूक्ष्म कणांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Leave a Reply