मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ जानेवारीपासून मेसेजिंग ॲप्स वापरण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. या बाबतचा नवा सिम बाइंडिंग नियम लागू केला जाणार आहे. या नियमाचा परिणाम काही वापरकर्त्यांवरही होणार आहे.
काय आहे नवा नियम?
नव्या नियमानुसार तुम्ही ज्या मोबाईल क्रमांकावरून मेसेजिंग ॲप वापरत आहात, तो सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणे आवश्यक राहील. म्हणजेच तुमचे ॲप खाते तुमच्या फोनमधील सिमशी जोडलेले असेल.
नियम का आणला जात आहे?
ऑनलाइन स्कॅम आणि बनावट खात्यांना आळा घालण्यासाठी हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे. सिम आणि ॲप खाते जोडलेले असल्याने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल.
१ जानेवारीपूर्वी आपले सिम आणि मेसेजिंग ॲप एकाच फोनमध्ये असल्याची खात्री करून घेणे वापरकर्त्यांसाठी शहाणपणाचे ठरेल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply