पुण्यात एका शाळेत शिकणाऱ्या नववीतील मुलीवर तिच्याच शाळेतील एका मुलाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही नववीत शिकत असून एकाच शाळेतील विद्यार्थी आहेत. या घटनेने शाळकरी विद्यार्थ्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एकमेकांना ओळखतही नव्हते
आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही नववीत असले तरी त्यांचे बोर्ड वेगळे असल्याने ते एकमेकांना ओळखतही नव्हते. शाळेची सहल पाचगणी-महाबळेश्वरला गेली होती. त्यावेळी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. एका छोट्या व्हिडिओवरून सुरू झालेला वाद एवढ्या गंभीर टप्प्यावर पोहोचेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
व्हिडिओवरून वाद, मग हल्ला
सहलीदरम्यान काढलेल्या व्हिडिओवरून झालेल्या वादातूनच हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमधील सोशल मीडियावरील वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो, हे या घटनेतून दिसून आले आहे. पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या सोशल मीडिया वापराकडे लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
Leave a Reply