पाचोरा (नाशिक) : भारतीय रेल्वेच्या स्पेशल कॅम्पेनअंतर्गत पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकावर रेल जनसंवाद अभियान राबविण्यात आले. स्टेशन प्रबंधक ए. के. शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या अभियानात रेल्वे प्रवासी, युवक आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून रेल्वे सेवांबाबत जनजागृती करण्यात आली.
रेल की आवाज, युवा की सोच, रेल का समाधान
या संकल्पनेतून आयोजित अभियानाचा मुख्य उद्देश रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील संवाद बळकट करणे, प्रवाशांच्या अडचणी व सूचना जाणून घेणे आणि रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे हा आहे. रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि रेल्वेच्या विविध सुविधांबाबत माहिती पोहोचवणे यावर यावेळी भर देण्यात आला.
मान्यवरांचा सहभाग
या उपक्रमात सरपंच सुभाष तावडे, माजी सैनिक जगन्नाथ पाटील, डॉ. एस. पी. पाटील, डॉ. निवृत्ती मराठे, पत्रकार राजेंद्र पाटील, नगराज पाटील, संतोष कुमार आणि योगेश तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply