नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एका लग्नसोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. प्रेमविवाहावरून असलेल्या नाराजीमुळे लग्नमंडपातच दोन गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवरदेवाला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप
हाणामारीदरम्यान नवरदेवावर डिझेल ओतून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर नवरदेवाच्या नातेवाईकांनाही डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. नवरदेव आणि नवरी या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीत ७ ते ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओ पोलिसांकडे; संशयित ताब्यात
लग्नमंडपातील संपूर्ण गोंधळ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ पोलिसांनाही देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने कारवाई सुरू केली. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply