अहिल्यानगरमधील मुकुंदनगर, गोविंदपुरा आणि फकीरवाडा परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला मेजर गयास मिर्झा, डॉ. जी. पी. शेख, ॲड. हनिफ शेख यांच्यासह अनेक ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.
व्यसनमुक्तीसाठी ज्येष्ठांचा पुढाकार
तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशी खंत सभेत व्यक्त करण्यात आली. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि परिसरात निरोगी सामाजिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिसरात व्यसनमुक्ती अभियान राबवण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
याशिवाय अपूर्ण असलेल्या सभागृहाचे काम पूर्ण करणे, ज्येष्ठ विधवा महिला व पुरुषांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणे, तसेच संघाचे कामकाज अधिक गतिमान करणे, असे महत्त्वाचे ठरावही सभेत घेण्यात आले.
नवीन कार्यकारिणीची निवड
संघाच्या कामकाजाला गती देण्यासाठी नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्याचा निर्णय सभेत झाला. अध्यक्षपदी उस्मान मिया शेख यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून रऊफ मोहम्मद शेख आणि आलम शफी खान यांची, तर कार्याध्यक्ष म्हणून आरिफ शेख यांची निवड झाली. सचिवपदी फकीर मोहम्मद इमाम, सहसचिवपदी मिर्झा नवेद अंजुम आणि इस्माईल शेख, तर खजिनदारपदी अब्दुल सईद हाफीज यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारी सदस्य म्हणून बशीर अब्दुल पठाण, बिलाल अहमद शेख, अजिज हैदर सय्यद, एकबाल गुलाम दस्तगीर सय्यद, शरफुद्दीन जैनुद्दीन शेख, हबीब मकबुल पठाण, अब्दुल कादर मोहम्मद सय्यद, फकीर इनामदार आणि इम्तियाज मुजफ्फर सय्यद यांची निवड करण्यात आली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply