महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि राज्य कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तांभेरे (ता. राहुरी) येथे शेतकरी-शास्त्रज्ञ-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून कृषी ज्ञानाचे मंथन झाले असून, तरुण शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यावर भर देण्यात आला. कृषी विभागाच्या मदतीने शास्त्रज्ञांनी तरुण शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावे, ही भूमिका या कार्यक्रमातून पुढे आली.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, ताराचंद गागरे, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भारत पाटील, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय कोळसे, जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, शास्त्रज्ञ डॉ. तुळशीदास बाष्टेवाड आणि प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रगतशील शेतकरी महिलेचा सत्कार
कार्यक्रमात डॉ. विक्रम कड, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. आनंद जाधव आणि डॉ. विजयकुमार शिंदे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले, तर ताराचंद गागरे, लक्ष्मण गागरे आणि प्रा. मच्छिंद्र निमसे यांनी आपली मते मांडली. चिंचविहिरे येथील प्रगतशील शेतकरी महिला निर्मलाताई गाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले, तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.
शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी एकाच व्यासपीठावर आल्याने शेतीतील नवी माहिती, अनुभव आणि प्रश्न यांची थेट देवाणघेवाण झाली. विद्यापीठातील संशोधन शेताच्या बांधापर्यंत पोहोचवणे आणि तरुण पिढीला शेतीतील तंत्रज्ञानाशी जोडणे, हे अशा सुसंवादाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply