अभिनेता, मॉडेल आणि स्प्लिट्सव्हिला फेम सौरव बेदी बऱ्याच काळापासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असलेला सौरव वयाने मोठ्या असलेल्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. डेलनाझ दारुवालासोबतचे त्याचे अनेक खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटो व्हायरल होताच त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सौरवने आता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
पॉडकास्टमध्ये मनमोकळेपणाने भाष्य
सौरवने अलीकडेच डेलनाझ दारुवालासोबतचे नाते, निहारिका तिवारीसोबतचे ब्रेकअप आणि ट्रोलिंग यावर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. डेलनाझसोबतच्या नात्याची घोषणा केल्यानंतर त्याला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला, असे त्याने स्पष्ट केले. अलीकडेच अभिनेत्याने नयनदीप रक्षितच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती, तिथे त्याने आपल्या नात्यावर भाष्य केले.
पॉडकास्टमध्ये सौरव म्हणाला की, तो थोडा सभ्य आहे आणि ट्रोल करणाऱ्या तरुणाने याबद्दल त्याच्यासमोर येऊन बोलावे, असे आव्हान त्याने दिले. मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणारा तो एकटा पुरुष नाही, असेही तो म्हणाला. ट्रोलर्सच्या वाईट कमेंट्सचा आपल्यावर परिणाम होत नाही, असे सौरवने सांगितले.
आठ वर्षांपासून मैत्री
डेलनाझ आणि आपण गेल्या आठ वर्षांपासून मित्र आहोत, असे सौरव पॉडकास्टमध्ये म्हणाला. तिलाही ट्रोलिंगची पर्वा नाही, असे त्याने स्पष्ट केले. वयातील अंतरावरून येणाऱ्या वाईट कमेंट्सवरही त्याने पॉडकास्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा