कालभैरव हे भगवान शंकरांचे रौद्र रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि भय, नकारात्मक शक्ती तसेच जीवनातील अडचणींपासून मुक्ती देतात. त्यामुळे कालभैरव जयंतीचा दिवस त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कालभैरव जयंती कधी साजरी होते?
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. याच दिवशी भगवान शंकर कालभैरव रूपात प्रकट झाले, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा १ डिसेंबर २०२६, मंगळवारी कालभैरव जयंती साजरी होणार आहे. बाबा कालभैरव यांना काशीचे कोतवाल असेही म्हटले जाते.
या दिवशी कोणते उपाय करावेत?
कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री भगवान कालभैरवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि भीतीपासून मुक्ती मिळते. काळ्या कुत्र्याला कालभैरवांचे वाहन मानले जाते, त्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे शुभ मानले जाते. पोळीला थोडे मोहरीचे तेल लावून किंवा गोड पोळी करूनही खाऊ घालता येते. या दिवशी काळे तीळ, अख्खी उडीद डाळ, मोहरीचे तेल आणि काळ्या कपड्यांचे दान करणेही शुभ मानले जाते. असे केल्याने अडथळे दूर होतात आणि कालभैरवांचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा