हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना गूळ खायला आवडतो. काही जण जेवणानंतर गुळाचा खडा खातात, तर काही जण साखरेऐवजी गूळ वापरून गोड पदार्थ तयार करतात. मात्र गूळ केवळ खाण्यापुरता मर्यादित न ठेवता तो आहारात वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करता येतो. योग्य पद्धतीने गूळ खाल्ल्यास त्याचा फायदा अधिक मिळतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
दुधासोबत आणि कोमट पाण्यासोबत गूळ
एका ग्लास किंवा कप दुधात थोडा गूळ मिसळून प्यायल्यास ते फायदेशीर ठरू शकते. हे मिश्रण चवीला चांगले लागते आणि तयार करायलाही फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे दैनंदिन आहारात त्याचा सहज समावेश करता येतो. याशिवाय कोमट पाण्यात थोडासा गूळ घालून तो नीट ढवळून घ्यावा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे, असेही सुचवले जाते. गुळाचे कोमट पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते.
हलवा आणि तीळासोबत गूळ
हलवा तयार करताना साखरेऐवजी गुळाचा वापर करता येतो. गुळामुळे हलव्याला वेगळी चव मिळते आणि गोडवाही सौम्य राहतो. उदाहरणार्थ, बटाट्याचा हलवा गूळ वापरून तयार करता येतो. याशिवाय गूळ दूध, डाळ, हलवा, कोमट पाणी किंवा तीळासोबतही घेता येतो. अशा प्रकारे दैनंदिन आहारात गुळाचा समावेश करणे सोपे होते आणि एकाच वेळी दोन गोष्टींचे फायदे मिळतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा