विकी डोनरपासून उरीपर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार तिची एकूण संपत्ती सुमारे ९९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
मुंबईतील घर आणि हिमाचलातील मालमत्ता
यामी आणि तिचे पती, दिग्दर्शक आदित्य धर यांचे मुंबईतील वांद्रे परिसरात घर आहे. माध्यमांतील माहितीनुसार या घराची किंमत अंदाजे १५ ते २० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. घराची सजावट साधी, निसर्गाच्या जवळ जाणारी आहे. लाकडी काम, हिरवी झाडे आणि सुंदर बाल्कनी यामुळे घराला वेगळी ओळख मिळाली आहे.
याशिवाय हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील गोहर परिसरात यामीची सुमारे २५ एकरांवर पसरलेली मालमत्ता आहे. जवळपास शंभर वर्षे जुने असलेले हे घर पारंपरिक हिमाचली वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते आणि त्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
महागड्या गाड्यांचा ताफा
त्यांच्या गाड्यांच्या संग्रहात ऑडी क्यू७, ऑडी ए४ आणि बीएमडब्ल्यू एक्स७ यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. छोट्या पडद्यापासून कारकीर्द सुरू करून यामीने मोठ्या पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज ती कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असून तिच्या संपत्तीची आणि जीवनशैलीची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा