हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी काळाच्या ओघात विसरली जातात, पण काही गाणी पिढ्यान्पिढ्या तोंडपाठ राहतात. आशा भोसले यांनी १९७३ मध्ये आलेल्या ‘लोफर’ चित्रपटासाठी गायलेलं ‘कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू’ हे असंच एक गाणं आहे. ५३ वर्षं उलटूनही हे गाणं आज लग्न, साखरपुडा आणि सोशल मीडियावरील रील्समध्ये तितक्याच उत्साहात वाजतं.
गाण्यामागची टीम
या चित्रपटाचं दिग्दर्शन ए. भीम सिंह यांनी केलं होतं, तर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलं होतं. गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले होते. आशा भोसले यांनी आपल्या आवाजात अशी हरकत मिसळली की हे गाणं सदाबहार ठरलं. चित्रपटात धर्मेंद्र, मुमताज, ओम प्रकाश आणि प्रेमनाथ यांच्या भूमिका होत्या. या गाण्यात मुमताज आणि फरीदा जलाल यांनी सख्यांसोबत गात-नाचत केलेला परफॉर्मन्स आजही स्मरणात राहतो.
पंजाबी तडका आणि हलकाफुलका अंदाज
हे गाणं चित्रपटातील एका हलक्याफुलक्या, मजेदार क्षणी येतं. शहरी बाबू आणि गावातील गोरी यांच्यातील प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर हे गाणं उभं आहे. त्यात पंजाबी अंदाज मिसळलेला आहे. ‘मैं छम छम नचदी फिरां’ ही ओळ गाण्याला आणखी मजेदार बनवते. प्रेमात बुडालेल्या मुलीच्या मनातील नटखटपणा, लाजणं आणि घाबरणं या भावना गाण्यातून व्यक्त होतात. ढोलक, घुंगरू आणि जलद ताल असलेलं संगीत ऐकताच पाय थिरकायला लागतात, हेच या गाण्याचं वैशिष्ट्य आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा