थंडीत वातावरणात गारवा आणि कोरडेपणा असतो. अशा वेळी दररोज केस धुवावे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे टाळू आणि केसांतील ओलावा लवकर कमी होतो. त्यामुळे दररोज शॅम्पूने केस धुतल्यास नैसर्गिक तेल कमी होऊन टाळू कोरडा पडण्याची शक्यता असते.
केस कधी धुवावे
थंडीच्या दिवसांत दररोज केस धुण्यापेक्षा आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे फायद्याचे ठरू शकते. मात्र तुमचा टाळू खूप तेलकट असेल किंवा घाम येत असेल, तर तुम्ही नियमितपणे केस धुवू शकता. केसांची गरज आणि टाळूची स्थिती पाहून केस धुण्याचे प्रमाण ठरवावे.
थंडीत केस धुण्याची योग्य पद्धत
थंडीच्या दिवसात केस धुताना खूप कडक किंवा खूप गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा. केसांतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सौम्य दर्जाचे शॅम्पू वापरा आणि केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा. केस धुतल्यानंतर ते हळुवार टिपून नीट कोरडे करा. ओले केस जोरजोरात टॉवेलने पुसू नका.
प्रतिक्रिया व्यक्त करा