, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

‘यांना लाज वाटली पाहिजे’; दिपकेंवर कृष्णराज महाडिक बरसले

अभिजीत दिपके यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिपकेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘यांना लाज वाटली पाहिजे’; दिपकेंवर कृष्णराज महाडिक बरसले

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हनुमान चालिसा ऐकवली आणि त्याचा अनादर केल्याची चर्चा आहे. यावर महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया देत दिपकेंवर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

बुधवारी अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याची सुरुवात त्यांनी एका गाण्याने केली. हे गाणं होतं मोदी चालीसा. या गाण्यानंतर दिपके यांनी मोदींचा नाही, तर हनुमान चालिसाचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. या प्रकारानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.

महाडिक काय म्हणाले?

कृष्णराज महाडिक म्हणाले, दिपकेबद्दल फारसं काही बोलण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचा संपूर्ण अजेंडा देशात अराजकता पसरवण्याचा आहे, हे आता स्पष्टपणे समोर येत आहे. “त्या लोकांना लाज वाटली पाहिजे की आमच्या हिंदू धर्माच्या किंवा आमच्या हनुमान चालिसाचा रिमिक्स करून अपमानस्पद गोष्टी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत,” असे महाडिक म्हणाले. देशविरोधी सीजेपीचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले असून त्यामध्ये अशा पक्षांचा पाठिंबा दिसतो, जे फक्त सरकारचा विरोध करतात आणि अराजकता पसरवतात, असा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडियावरून पसरवलेल्या गोष्टी युवकांवर फारसा प्रभाव टाकणार नाहीत, असेही महाडिक म्हणाले. युवा मोर्चा समाजात जाऊन, गावागावांत प्रवास करून युवकांशी संवाद साधतो आणि त्याचे काम भविष्यात अधिक प्रभावशाली दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance