गोव्याचा वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशिल्प वारसा जपत शाश्वत आणि लोककेंद्रित वास्तुरचना विकसित करण्यावर भर देण्याची गरज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. पणजी येथे झालेल्या ‘डिझाइन अँड व्हिजन नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटिरिअर डिझाइन एक्सलन्स अवॉर्ड्स अँड कॉन्फरन्स २०२६’ या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला देशातील २७ राज्यांमधून ४०० हून अधिक व्यावसायिक उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. शंकर यांचा सत्कार
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘द पीपल्स आर्किटेक्ट’ म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. जी. शंकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. आनंद जी. नाईक यांनी लिहिलेल्या डॉ. शंकर यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
विकसित भारत २०४७ ची संकल्पना
विकसित भारत २०४७ च्या संकल्पपूर्तीसाठी वास्तुरचनेत स्थानिक संस्कृती, वारसा आणि नागरिकांच्या गरजांचा समन्वय साधण्याचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. वास्तुरचना ही केवळ इमारतींची रचना नसून ती समाजाच्या गरजा आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारी असावी, असा संदेश या परिषदेतून देण्यात आला.
प्रतिक्रिया व्यक्त करा