नारळ स्वयंपाकघरात विविध भाज्या, चटण्या आणि इतर पारंपारिक पदार्थांमध्ये वापरला जातो. ताजा नारळ त्याच्या खास चवीसाठी आणि पोषणतत्त्वांसाठी ओळखला जातो. परंतु, नारळ फोडल्यानंतर तो जास्त काळ तसाच ताजा ठेवणे थोडे कठीण असते. नारळ व्यवस्थित साठवून ठेवला नाही, तर त्याची चव आणि सुगंध बदलू शकतो.
चांगल्या क्वालिटीचा नारळ कसा निवडावा?
नारळ खरेदी करताना तो हलक्या हाताने हलवून पाहा. नारळाच्या आत पाणी असेल तर ते नारळ ताजे असण्याचे एक लक्षण मानले जाते.
फोडलेला नारळ फ्रिजमध्ये कसा ठेवावा?
नारळ फोडल्यानंतर थंड हवामानात ठेवला तर अधिक काळ टिकतो, तर उष्ण किंवा दमट हवामानात तो लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे नारळ फोडल्यानंतर कधीही बाहेर ठेवण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे. नारळाचा पांढरा गर कवचापासून वेगळा करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. फ्रिजमध्ये ठेवायचा असल्यास नारळ ड्रॉवरमध्ये ठेवा; येथील थंड तापमानामुळे तो लवकर खराब होण्याची शक्यता कमी होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा