भारतीय संघाचे दोन क्रिकेटपटू एकेकाळी खूप जवळचे मित्र होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वर्षे एकत्र खेळताना त्यांची मैत्री घट्ट झाली होती. मात्र एका नात्यामुळे त्या मैत्रीला मोठा धक्का बसला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ आले. हे दोन खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक आणि मुरली विजय.
२००७ मधील लग्न आणि २०१२ मधील वादळ
२००७ मध्ये अवघ्या २१ वर्षांचा असलेला दिनेश कार्तिकने आपली बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न केले. निकिता आणि दिनेश लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते आणि एकत्र मोठे झाले होते. निकिताचे वडील आणि दिनेशचे वडील हे देखील चांगले मित्र होते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने दोघांनी मुंबईत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
२०१२ मध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकला त्याची पत्नी निकिता आणि मित्र मुरली विजय यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल समजले. हे समजल्यानंतर दिनेश पूर्णपणे खचून गेला आणि त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतरचे आयुष्य
२०१२ मध्ये दिनेश कार्तिकपासून घटस्फोट झाल्यानंतर त्याच वर्षी निकिता आणि मुरली विजय यांनी लग्न केले. २०१३ मध्ये विजय आणि निकिताच्या मुलाचा जन्म झाला. अनेक वृत्तांनुसार, घटस्फोटाच्या वेळी निकिता गर्भवती होती आणि ते बाळ मुरली विजयचे होते. २०१४ आणि २०१७ मध्ये निकिता आणि मुरली पुन्हा पालक झाले.
या घटनेनंतर मुरली विजय आणि दिनेश कार्तिक कधीही एकत्र खेळले नाहीत. २०१८ मध्ये टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी दोघांची एकत्र निवड झाली. हा त्या दोघांसाठी खूप अवघड क्षण होता, असे म्हटले जाते.
प्रतिक्रिया व्यक्त करा