सीमांकन विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी या विधेयकावर जोरदार विरोध व्यक्त केला आहे. त्यांनी या विधेयकाला देशद्रोही असे संबोधले आहे.
करदात्यांवर भार आणि भाजपचा अजेंडा
ठाकरे यांच्या मते, हे विधेयक करदात्यांच्या पैशांवर अनावश्यक भार टाकणारे आहे. खासदारांची संख्या वाढल्यास त्यांचे वेतन आणि सुविधांवर मोठा खर्च होईल आणि तो खर्च सामान्य जनतेच्या खिशातून जाईल. तंत्रज्ञानाच्या युगात खासदारांची संख्या वाढवण्याऐवजी त्यांच्या खासदार निधीत वाढ करावी, अशी सूचना त्यांनी केली. या विधेयकामागे भाजपचा छुपा अजेंडा असून, निवडणूक क्षेत्रांच्या सीमा बदलून स्वतःच्या फायद्यासाठी विजय मिळवायचा आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडीत मतभेद?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या विधेयकाच्या विरोधात ठामपणे उभा असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हे विधेयक देशाच्या हिताचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा