, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयकावर शिंदेंची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

डिलिमिटेशन विधेयकावरून वाद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी विधेयकाचं समर्थन केलं आहे.

डिलिमिटेशन विधेयकावर शिंदेंची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

मतदारसंघ पूनर्रचना विधेयकावरून देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी संसदेत हे विधेयक मांडले जाणार आहे. त्याआधी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतली असून दिल्लीत आघाडीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही खासदाराने हजेरी लावली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विधेयकाचे समर्थन केले आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा नवा सुवर्णअध्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर मतदारसंघांची पुनर्रचना ही काळाची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक राज्यातील जागा ५० टक्क्यांनी वाढणार असल्याने कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

मतदारसंघांचा आकार सुटसुटीत झाल्यास लोकप्रतिनिधींना शेवटच्या घटकापर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल आणि विकासकामांचा वेग दुपटीने वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

महिला आरक्षण आणि विरोधकांची भूमिका

या ऐतिहासिक प्रक्रियेतून नारी शक्ती वंदन कायद्याअंतर्गत महिलांना ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होणार असून, संसदेत महिलांना त्यांचा हक्काचा आवाज मिळणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उचललेले हे पाऊल केवळ राजकीय निर्णय नसून महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीला निर्णायक दिशा देणारी क्रांती असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संकुचित राजकारण आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राष्ट्रहित सर्वतोपरी मानावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी पवार यांचा पक्ष सरकारला या विधेयकावर पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे, तर सुप्रिया सुळे यांनी यावर सावध भूमिका घेतली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance