केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकानुसार देशातील सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट ५० टक्क्यांची वाढ होणार आहे. हे विधेयक पारित झाल्यास लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून सुमारे ८१५ होईल. राज्यघटनेतील कमाल जागांची मर्यादा ५५० वरून ८५० पर्यंत नेण्याचा प्रस्तावही या विधेयकात मांडण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाची मंजुरी आणि महिला आरक्षण
केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. ही दोन्ही विधेयके आता संसदेत मांडण्यात येणार असून, ती मंजूर करून घेण्यासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयकही याचबरोबर मांडण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात किती जागा वाढणार?
नव्या प्रस्तावानुसार महाराष्ट्रात सध्या असलेल्या ४८ खासदारांची संख्या ७२ पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच राज्यात २४ नवे खासदार वाढणार आहेत. या ७२ जागांपैकी २४ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. प्रत्येक राज्यात किती जागा वाढतील, याची राज्यनिहाय आकडेवारीही या विधेयकासोबत समोर आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा