अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, यामागे घरातील वास्तुदोषही एक कारण असू शकते. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक ठरावीक दिशा सांगितली आहे. या नियमांनुसार वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते, असे मानले जाते. घरातील कचरापेटी म्हणजेच डस्टबिन ठेवतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार, घरातील कचरापेटी दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. दक्षिण-पश्चिम दिशा ही कचरा किंवा टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिशेला डस्टबिन ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय घरातील कचरापेटी उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला डस्टबिन ठेवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. तसेच कचऱ्याचा डबा घराबाहेर ठेवू नये, तो नेहमी घराच्या आतच ठेवावा, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
वास्तुशास्त्र म्हणजे काय?
वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. घरात कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांनुसार घरातील वस्तूंची योग्य मांडणी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि वातावरण सुख-समृद्धीचे राहते, असे मानले जाते. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू ठेवताना या नियमांकडे लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा