३० नोव्हेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना दिल्लीत दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खासदारांना २९ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत हजर राहण्याचे निर्देश
काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदारांना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिवेशनाच्या आधीच पक्षाने तयारी सुरू केली असून सर्व खासदारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिवेशनात डिलिमिटेशन बिलाची शक्यता
३० नोव्हेंबरला बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या विधेयकावरून येत्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अधिवेशनात नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा