हिवाळ्यातील लग्नसराईत स्टायलिश दिसण्यासोबतच थंडीपासून बचाव करणे हे मोठे आव्हान असते. मात्र योग्य कापडाची निवड आणि हुशारीने केलेले लेअरिंग यामुळे थंडीतही अत्यंत रॉयल आणि आकर्षक दिसता येते. हिवाळ्यातील लग्नासाठी कोणते कपडे निवडावेत आणि थंडीपासून बचाव करताना लूक कसा जपावा, याबाबत काही उपयुक्त टिप्स पाहूया.
कापडाची निवड ठरवते लूक
हिवाळ्यातील लग्नासाठी वेल्वेट हा सर्वोत्तम आणि रॉयल पर्याय मानला जातो. वेल्वेटचे लेहेंगा, ब्लाऊज, शेरवानी किंवा सूट शरीराला ऊब देतात आणि दिसायलाही अत्यंत श्रीमंत लूक देतात. पातळ जॉर्जेट किंवा शिफॉनऐवजी जड सिल्क, बनारसी, कांजीवरम किंवा ब्रोकेड साड्या आणि ड्रेसेस निवडावेत. हे कापड थंड वारा रोखण्यास मदत करतात आणि लग्नाच्या कार्यक्रमात रॉयल भास निर्माण करतात.
लेअरिंग आणि शाल यांचा स्मार्ट वापर
लेहेंगा, अनारकली किंवा साडीवर मॅचिंग एम्ब्रॉयडरी केलेले लाँग जॅकेट किंवा केप घालणे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे थंडी वाजत नाही आणि आधुनिक लूकही मिळतो. डीप नेक किंवा स्लीव्हलेसऐवजी फुल स्लीव्हज, हाय-नेक किंवा बंदगळा ब्लाऊज आणि कुर्ते निवडल्यास थंडीपासून चांगला बचाव होतो. साडी किंवा लेहेंग्यावर ओढणीऐवजी एका खांद्यावर डिझायनर पश्मिना शाल किंवा भरजरी वेल्वेटची शाल घेतल्यास थंडीपासून बचाव होतो आणि रॉयल लूकही येतो. योग्य कापड, लेअरिंग आणि शालीच्या निवडीमुळे हिवाळ्यातील लग्नात थंडीची चिंता न करता आत्मविश्वासाने मिरवता येते.
प्रतिक्रिया व्यक्त करा