ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळंगुट आणि बागा परिसरात अवजड व मध्यम पर्यटक वाहनांच्या प्रवेशावर आणि वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
कोणत्या वाहनांना निर्बंध
या आदेशानुसार बस, मिनीबस आणि टेम्पो यांसह अवजड व मध्यम पर्यटक वाहनांना २१ नोव्हेंबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत कळंगुट आणि बागा परिसरात प्रवेश व वाहतुकीसाठी निर्बंध लागू राहतील. उत्सव काळात या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तात्पुरती पार्किंग व्यवस्था
वाहनांच्या पार्किंगसाठी कळंगुटमधील पोरबावाडो येथील बोडके वाड्याकडे तात्पुरती पार्किंग व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. पर्यटक वाहनांना या ठिकाणी पार्किंग करता येणार असून, त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा